‘उसात आंतरपीक घेतल्यास अधिक उत्पन्न’
आळेफाटा, ता. १९ : ऊस पिकामध्ये भाजीपाल्याची आंतरपीक लागवड केल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते, असे मत नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भरत टेमकर यांनी व्यक्त केले.
राजुरी (ता. जुन्नर) येथे नुकतेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या ते बोलत होते. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती जुन्नर व ग्रामपंचायत राजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टेमकर यांनी जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा आणि जिवाणूंचा वापर करण्याचे आवाहन केले. रासायनिक खते थेट न देता शेणखतात मिसळून द्यावीत, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच ऊस शेतीच्या बांधावर नारळ लागवडीसाठी शासकीय अनुदान उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
विघ्नहर कारखान्याचे संचालक विकास चव्हाण यांनी ‘सुपर केन’ तंत्रज्ञान, नर्सरी तंत्रज्ञान आणि पाणी व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. ऊस विकास अधिकारी मोरडे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय रावते, विठ्ठल भोईर, माऊली शेळके, लक्ष्मण भोंडवे, अविनाश औटी यांच्यासह अनेक मान्यवर व शेतकरी उपस्थित होते. संदीप ढोरे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन लक्ष्मण झांजे यांनी केले.
07916
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

