

आळेफाटा, ता. १ : बोरी बुद्रुक ते आळेगाव या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आळेफाटा बाजारपेठेला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गाची तातडीने दुरुस्ती व रुंदीकरण करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
बोरी बुद्रुक ते आळे या तीन-चार किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. जाधववाडी, शिरोली सुलतानपूर, तांबेवाडी, माळवाडी आणि साळवाडी या गावांतील नागरिकांना आळेफाटा बाजारपेठेत येण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. काही ठिकाणी जलवाहिनीसाठी रस्ता खोदल्यानंतर तो व्यवस्थित न बुजवता केवळ माती टाकून सोडल्याने चिखल आणि खड्ड्यांची समस्या निर्माण झाली आहे.
रस्ता अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना जागा देताना वाहनचालकांमध्ये वारंवार वादाचे प्रसंग घडत आहेत. अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
07976
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.