

आळेफाटा, ता. ३ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात गुरुवारी झालेल्या गाईंच्या लिलावात ५५ लाख रुपयांची उलाढाल झाली. बाजारात आलेल्या ३६५ संकरित गाईंपैकी २६७ गाईंची विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील चाकणनंतरचा हा सर्वात मोठा बाजार समजला जातो. येथे अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून शेतकरी गाईंच्या खरेदी-विक्रीसाठी येतात. सध्या पावसामुळे चारा उपलब्ध असल्याने गाईंना मोठी मागणी आहे. जुन्नरच्या पूर्व भागातील राजुरी, आळे, वडगाव आनंद या परिसरात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारला असून अनेक शेतकऱ्यांकडे १०० हून अधिक गाई आहेत. दुधाचे दर स्थिर असले तरी शेतीसाठी मिळणारे खत आणि गोमूत्र यामुळे शेतकरी या व्यवसायाला पसंती देत असल्याचे ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, याकूब सौदागर, रुपेश कुऱ्हाडे, शानु बेपारी यांसह अन्य व्यापाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.