

आळेफाटा, ता. ७ ः राजुरी (ता. जुन्नर) येथील आडेवहाळ मळ्यामधील श्री मुंजोबा महाराजांच्या उत्सवानिमित्त उद्यापासून (ता. ८) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यामध्ये श्रींचा अभिषेक, दुपारी सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी हरिपाठ, सात ते नऊ यावेळेत नंदकिशोर महाराज देवकर (शिर्डी) यांचे कीर्तन होणार आहे. कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.