

आळेफाटा, ता. ९ : जुन्नर तालुक्यात एकेकाळी सामुदायिक विवाह सोहळ्यांची मोठी सामाजिक परंपरा होती. तालुक्यातील वडज, ओझर, राजुरी, आणे आणि आळे यांसारख्या प्रमुख गावांमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात हे सामुदायिक सोहळे आयोजित केले जात होते. १९८८ मध्ये शांतिलाल मुथ्था यांनी पदयात्रेद्वारे या चळवळीचा राज्यभर प्रसार केला, ज्यामुळे हुंडाबळी आणि विवाहातील खर्चाला मोठ्या प्रमाणावर चाप बसला होता.
या चळवळीने समाजातील अनेक अनिष्ट प्रथांना कायमची बंदी घालून विखुरलेल्या ग्रामस्थांना एकत्र आणले. कमी खर्चात विवाह पार पडत असल्यामुळे गरीब पालकांना यामुळे मोठा मानसिक व आर्थिक दिलासा मिळाला. गावोगावच्या विकासाला आणि सामाजिक सलोख्याला यामुळे खऱ्या अर्थाने बळकटी मिळाली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत लक्ष्मीपुत्रांच्या आगमनामुळे आणि वाढत्या कार्यालय संस्कृतीमुळे ही महत्त्वाची सामाजिक चळवळ आता पूर्णपणे मागे पडू लागली आहे. आजकाल लग्नाचे प्रशस्त हॉल किंवा मंगल कार्यालये हा वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय बनला असून तिथे लाखो रुपयांची प्रचंड उधळपट्टी केली जात आहे. यामुळे सामान्य कुटुंबांवर आर्थिक बोजा वाढून एकेकाळी यशस्वी ठरलेली ही क्रांती आता पूर्णपणे थंडावलेली दिसते. म्हणूनच आता भावी सुशिक्षित तरुण पिढीने या उपयुक्त चळवळीला पुन्हा एकदा नवसंजीवनी देणे काळाची गरज बनली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.