

आळेफाटा, ता.१५ : आधुनिक काळात ब्लँकेटचा वापर वाढला असला, तरी सोलापूरचे मारुती बाबूराव वायकर आजही पिढ्यानपिढ्या चालत आलेली घोंगडी विणण्याची कला जोपासत आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील बाजारांत या घोंगड्यांना आता आरोग्याच्या दृष्टीने नवी मागणी मिळत आहे.
आळे (ता.जुन्नर) परिसरात वायकर मेंढ्यांची लोकर विकत घेऊन ती पिंजतात. त्यानंतर चरख्यावर सूत कातले जाते. सुताला मजबुती देण्यासाठी चिंचोक्यांची खळ, हळद आणि आयुर्वेदिक अर्काचा वापर केला जातो. एक घोंगडी विणण्यासाठी साधारण दोन ते तीन दिवस लागतात. ५ ते ६ किलो लोकरीपासून तयार होणारी ही घोंगडी ७०० ते १५०० रुपयांपर्यंत विकली जाते. वायकर स्वतः विविध जिल्ह्यांतील आठवडे बाजार, जत्रा आणि कृषी प्रदर्शनांत जाऊन याची विक्री करतात.
आरोग्यासाठी फायदेशीर :
घोंगडीवर झोपल्याने पाठदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. शांत झोप लागते आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. शहरी भागात आता याच्या औषधी गुणधर्मांमुळे मागणी वाढत आहे, असे मारुती वायकर यांनी सांगितले.
08023
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.