शाळा, शिकवणींच्या जाहिरातींविरुद्ध एल्गार

शाळा, शिकवणींच्या जाहिरातींविरुद्ध एल्गार
Published on

आळेफाटा, ता. १७ : राज्यातील शाळा आणि खासगी शिकवणी वर्गांकडून केल्या जाणाऱ्या भ्रामक जाहिरातींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली आहे. याबाबत प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक फसवणूक थांबवण्याची विनंती केली आहे.
शासकीय नियमांनुसार कारवाई अपेक्षित असताना अनेक संस्था ''इंटरनॅशनल'', ''ग्लोबल'' किंवा ''सीबीएसई पॅटर्न'' अशा शब्दांचा अनधिकृत वापर करून पालकांची दिशाभूल करत असल्याचे औटी यांनी निवेदनात म्हटले आहे. प्रत्यक्षात मान्यता नसतानाही अशा नावांचा वापर करून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात आहे. तसेच काही संस्था “१०० टक्के निकाल”, “यशाची हमी”, “मोफत सुविध” अशा आकर्षक जाहिराती देऊन मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत असल्याचेही त्यांनी सांगितले. ही बाब ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारी असल्याचा इशारा त्यांनी दिला.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा व शिकवणी संस्थांची तत्काळ तपासणी करावी, अनधिकृतपणे इंटरनॅशनल किंवा सीबीएसई अशा शब्दांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच सर्व शाळांची मान्यता, संलग्न बोर्ड आणि शुल्क संरचना अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, अनधिकृत संस्थांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी आणि तक्रारींसाठी ऑनलाइन हेल्पलाइन सुरू करावी, असेही औटी यांनी स्पष्ट केले. शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांचे ग्राहक म्हणून हक्क सुरक्षित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com