

आळेफाटा, ता. २४ : जुन्नर तालुक्यातील आळेफाटा, राजुरी आणि वडगाव आनंद परिसरात गुरुवारी (ता. २३) रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीस आलेला गहू, हरभरा आणि कांदा यांसह फळबागांना फटका बसल्याने महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अचानक आलेल्या या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी ऊस, मका आणि बाजरीची पिके भुईसपाट झाली आहेत. तसेच, आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाऱ्यामुळे विजेचे खांब पडल्याने परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. भाजीपाला आणि कलिंगड पिकांचेही नुकसान झाल्याने शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
08068
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.