बोरीतील संपत चिंचवडेंच्या बाजरीचा प्रयोग दिशादर्शक

बोरीतील संपत चिंचवडेंच्या बाजरीचा प्रयोग दिशादर्शक
Published on

आळेफाटा, ता. ४ : तामिळनाडूतील कोइंबतूर कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘सी.ओ.एच- १०’ या बाजरीच्या वाणाने बोरी खुर्दमध्ये (ता. जुन्नर) उत्पादनाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. शेतकरी संपत चिंचवडे यांना या वाणातून एकरी ३० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा असून, परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग दिशादर्शक ठरत आहे.
मागील वर्षी ‘आत्मा’ कृषी विभागाच्या अभ्यास दौऱ्यात चिंचवडे यांनी या वाणाची निवड केली होती. एक फूट लांबीचे कणीस, टपोरे दाणे आणि काढणीपर्यंत हिरवेगार राहणारे ताट ही या वाणाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या पिकाच्या जोमदार वाढीमुळे चिंचवडे यांच्या शेतात सध्या शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
या प्रयोगाची दखल घेत ‘आत्मा’ कृषी विभागातर्फे चिंचवडे यांच्या शेतावर नुकताच मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक डी. डी. पाबळे व सूर्यकांत विरनक यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. पुढील हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड करावी, असे आवाहन पाबळे यांनी केले.
यावेळी ‘विघ्नहर’चे संचालक विकास चव्हाण, विजय डुकरे, उत्तम जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

08102

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com