

आळेफाटा, ता. ४ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात रविवारी (ता. ३) कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली. यावेळी ६ हजार ८२२ पिशव्यांची आवक झाली असून, एक नंबर गोळा कांद्यास १० किलोसाठी १५१ रुपयांपर्यंत भाव मिळाला.
बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक प्रितम काळे, सचिव रुपेश कवडे व व्यवस्थापक सतीष म्हस्करे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलावात कांद्याचे भाव पुढीलप्रमाणे : एक नंबर कांद्यास १३० ते १५१, दोन नंबरला १२० ते १३०, तीन नंबर गोल्टीस १०० ते १२० तर बदला आणि चिंगळी कांद्यास प्रति १० किलो ३० ते ७८ रुपये भाव मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.