

आळेफाटा, ता. ६ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात मंगळवारी (ता.५) कांद्याच्या ११ हजार २८१ पिशव्यांची आवक झाली. एक नंबर गोळा कांद्याच्या दहा किलोस १५१ रुपये बाजारभाव मिळाला आहे. यावेळी बाजारभावात प्रतिकिलोमागे दोन रुपयांनी वाढ झाली.
बाजारात एक नंबर कांद्याच्या दहा किलोस १३० ते १५१, दोन नंबरला १२० ते १३०, तीन नंबर गोल्टीस १०० ते १२०, चिंगळी कांद्यास ३० ते ८० रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.