हुमणीवरील नियंत्रणासाठी जैविक बुरशी वापरावी : गावडे

हुमणीवरील नियंत्रणासाठी जैविक बुरशी वापरावी : गावडे

Published on

बेल्हे, ता. २६ : ''ऊस पिकातील हुमणी किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सामूहिकरीत्या हुमणीचे भुंगेरे गोळा करण्याबरोबरच मेटाराझीयम सारखी जैविक बुरशी वापरणे गरजेचे आहे,'' असे मत नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे केले.
पारगावतर्फे आळे (ता. जुन्नर) येथे मंगळवारी (ता.२५) रामवाडी परिसरात नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ''ऊस पिकावरील हुमणी किडीचे एकात्मिक कीड नियंत्रण'' या विषयावर प्रात्यक्षिक व कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. दत्तात्रेय गावडे म्हणाले की, कीड रोखण्यासाठी जैविक बुरशीनाशक मेटाराझीयमचा वापर जुलैचा शेवटचा आठवडा तसेच ऑगस्टचा दुसऱ्या व तिसऱ्या आठवडयात दोन ते तीन वेळेस मेटाराझीयम आणि बेव्हीरीया प्रत्येकी २ किलो याप्रमाणे जमीन चांगली ओली असताना ठिबक सिंचनातून किंवा आळवणीद्वारे जमिनीतून सोडावे. यामुळे हुमनी ही कीड संपूर्ण आटोक्यात आणता येते.
या कार्यक्रमप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे, भरत टेमकर, प्रगतशील शेतकरी दत्तात्रेय येवले, शंकर भोर, सत्यवान भोर, सखाराम पिंगळे, किशोर भोर, किरण येवले, सचिन भोर, गणेश भोर, सुखदेव येवले, बाळू येवले, संतोष येवले, बबन येवले, विकास येवले, आदित्य येवले, ऋषीकेश भोर आदी शेतकरी उपस्थित होते.
प्रगतशील शेतकरी दत्तात्रेय येवले यांनी आभारप्रदर्शन केले.

01830

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.