समर्थ पॉलिटेक्निक च्या १६ विद्यार्थ्यांची मदरसन या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी निवड

समर्थ पॉलिटेक्निक च्या १६ विद्यार्थ्यांची मदरसन या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी निवड

बेल्हे, ता. १६ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ पॉलिटेक्निक या महाविद्यालयाच्या एकूण १६ विद्यार्थ्यांची, नुकतीच कॅम्पस ड्राईव्ह २०२४ अंतर्गत ‘मदरसन ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे.
बेल्हे येथे समर्थ पॉलिटेक्निक या महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्ह २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मदरसन ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग या बहुराष्ट्रीय कंपनीमार्फत, विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस ड्राईव्ह साठी समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे मधून ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांना विषयाबाबतचे असलेले सखोल ज्ञान, संभाषण कौशल्य, सॉफ्ट स्किल, कलचाचणी या बाबीचा विचार करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती एच. आर. मॅनेजर प्रतीक लोखंडे यांनी दिली. यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून आदेश सरोदे, भूषण शिंदे, प्रथमेश बुट्टे, ओंकार पवार, दीपक चव्हाण, रामेश्वर कांदळकर तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातून गणेश खोसे, तेजस खुटाळ, दीपक लोखंडे, पोपट निचित, यशराज पटवा, ऋषिकेश शिरोळे व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातून वैभव आहेर, प्रतीक भोर, अभिषेक खुटाळ व अथर्व भुजबळ या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
यावेळी निवड प्रक्रिया एच. आर. मॅनेजर प्रतीक लोखंडे यांनी पूर्ण केली. ही प्लेसमेंट ड्राईव्ह पूर्ण करण्यासाठी प्रा. संजय कंधारे, टेक्निकल डायरेक्टर डॉ. चंद्रशेखर घुले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. संकेत विघे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. महेंद्र खटाटे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. आशिष झाडोकर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा. आदिनाथ सातपुते, प्रा. हुसेन मोमीन, प्रा. माधवी भोर, प्रा. सोनम थोरात आदींनी परिश्रम घेतले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, टेक्निकल डायरेक्टर डॉ. चंद्रशेखर घुले, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर तसेच सर्व विभागाचे प्राचार्य, विभाग प्रमुख यांनी अभिनंदन केले.

बेल्हे (ता. जुन्नर) : समर्थ पॉलिटेक्निकमध्ये आयोजित कॅम्पस ड्राईव्ह २०२४ अंतर्गत '' मदरसन ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी'' कंपनीत नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यासमवेत उपस्थित मान्यवर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com