मनोज भालेराव यांची पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी

मनोज भालेराव यांची पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी
Published on

बेल्हे, ता. २७ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील मूळ रहिवासी असलेले मनोज शांताराम भालेराव यांची नुकतीच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.
बेल्हे येथील मूळ रहिवासी व पुणे येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले शांताराम भालेराव व इंदुमती भालेराव या दांपत्याचे सुपुत्र मनोज यांनी, पहिल्याच प्रयत्नात ‘पोलिस उपनिरीक्षक’ पदाला गवसणी घालत बेल्हे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मनोज यांनी पुण्याच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. त्यांचे वडील शांताराम भालेराव अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुणे येथे स्वतःचा व्यवसाय चालवत आहेत. त्यांचा मुलाने शासकीय सेवेत जावे, अशी त्यांची इच्छा होती, तसेच त्यांचा मोठा मुलगा महेश भालेराव हासुद्धा उच्चशिक्षित असून, स्वतःच्या व्यवसायाबरोबरच वडिलांनाही व्यवसायात मदत करतो. बेल्हे ग्रामस्थांकडून मनोज याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com