

बेल्हे, ता. २ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील श्री बेल्हेश्वर विद्यालयातील सन २०२४-२५ मधील एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी दोन विद्यार्थी तसेच सारथी शिष्यवृत्तीसाठी १४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
बेल्हे येथील श्री बेल्हेश्वर विद्यालयातील २०२४-२५ मधील एनएमएमएस परीक्षेत, आर्या रवींद्र बोरचटे व माहीन नुरजमील मोमीन हे दोन विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेला एकूण ५७ विद्यार्थी बसलेले होते. यापैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान एकूण १६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून, यापैकी १४ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान सारथी शिष्यवृत्तीसाठी वैभव पोपट आवारी, करण लक्ष्मण डुकरे, संस्कार अशोक गुंजाळ, मेघराज लक्ष्मण गुंजाळ, तसेच विद्यालयाच्या साकोरी भागशाळेतील चैतन्य प्रमोद गाडगे, समृद्धी कांचन गाडगे, समृद्धी दत्तात्रेय गुंजाळ, संचिता मंगेश नायकोडी, संस्कृती दिनेश गुंजाळ, आराध्या संदीप गुंजाळ, किमया विशाल आरोटे, दिव्या दत्तात्रेय गोरडे, आर्या संदीप बोरचटे, स्वरा संतोष तांबे हे विद्यार्थी पात्र ठरले असल्याचे प्राचार्य आर. पी. पडवळ यांनी सांगितले. दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांना एन. आर. मुळूक, व्ही. ए. गोसावी, श्रीमती एस. बी. बांगर, जे. डी. फापाळे व विभागप्रमुख जी. ए. फंगाळ आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.