बांगरवाडी परिसरात मोरांची पाण्यासाठी वणवण
बेल्हे, ता. १३ : बांगरवाडी (ता. जुन्नर) परिसरात उन्हाची तीव्रता वाढल्याने मोरांची पाण्यासाठी वणवण होत आहे. सध्या परिसरातील स्थानिक ग्रामस्थ मोरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, दानशूर मंडळी व स्वयंसेवी संस्थांनी परिसरातील मोरांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.
बांगरवाडी परिसरात जवळपास दोन-अडीचशे पेक्षा जास्त मोरांची संख्या असल्याचे सांगण्यात येते. सध्या उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. उन्हाच्या काहिलीने पक्षी कासावीस होत आहेत. सध्या स्थानिक ग्रामस्थांच्या पुढाकारातून बांगरवस्ती परिसरात सिमेंट बंधाऱ्याजवळ पाणवठ्याच्या ठिकाणी, टँकरने पाणी टाकण्यात येत असले तरी त्यालाही मर्यादा येत आहेत. सध्या स्थानिक ग्रामस्थांकडून प्रायोगिक स्वरूपात टँकरद्वारे वन्य जीवांसाठी पाण्याची व्यवस्था केली जात आहे. यासाठी नकाजीबुवा बांगर, नारायणशेठ सावंत प्रभाकर डोंगरे, राजू कदम, किरण फापाळे, वसंत (अण्णा) बांगर, कैलास बांगर, बाळासाहेब बांगर, सुभाष रोकडे, कृष्णा बांगर, लक्ष्मण (पाटील) बांगर आदींचे विशेष सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात आले.
मोरांचा येथे वावर अधिक
श्री गुप्तविठोबा मंदिर परिसर
दावलमलिक डोंगर पायथा
शिडी विभाग
रानदेवी वस्ती
थडगेवस्ती फापाळे वस्ती
बांगरमळा
स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
शासनाच्या वनविभागाने परिसरात तातडीने पाणवठे तयार करून, मोर व इतर वन्य जीवांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान समाजातील दानशूर मंडळी व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन, परिसरातील मोरांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन बांगरवाडी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
02454
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

