बेल्ह्यात प्रकाश सापळे लावण्याचे प्रात्यक्षिक
बेल्हे, ता. १८ : बेल्हे (ता. जुन्नर) येथे कृषी विभागाच्या वतीने हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नुकतेच शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात प्रकाश सापळे लावण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी हुमणी किडीच्या एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीविषयी शेतकऱ्यांना कृषी पर्यवेक्षक प्रमिला मडके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
बेल्हे येथे हुमणी किडीच्या एकात्मिक कीड नियंत्रण संदर्भात, जुन्नरचे तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास शिवराम पाबळे यांच्या शेतावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळा, याबरोबरच बीजप्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. हुमणी किडीचा बंदोबस्त योग्य वेळी (जून ते ऑगस्ट) करणे महत्त्वाचे आहे. हुमणीची बारा महिन्यात एकच पिढी तयार होते. असे असले तरी अळीचा जास्त दिवसाचा कालावधी आणि पिकांच्या मुळांवर उपजीविका करण्याची क्षमता अधिक असल्याने पीक जास्त प्रमाणात नष्ट होते. त्यामुळे हुमणी कीड नष्ट करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा सर्वांगीण उपाय करणे आवश्यक असल्याचे कृषी पर्यवेक्षक प्रमिला मडके यांनी सांगितले. पावसाळ्याच्या सुरवातीला सूर्यास्तानंतर हुमणीचे भुंगेरे बाभळीच्या किंवा कडुनिंबाच्या झाडांवर पाने खाण्यासाठी जमा होतात. या किडींना आकर्षित करण्यासाठी झाडाखाली प्रकाश सापळे गरजेचे आहेत. त्यामुळे रॉकेल मिश्रित पाण्यात भुंगेरे पडून मरण पावतात. हे नियंत्रण उपायांमध्ये सर्वात प्रभावी व कमी खर्चाचे आहे. दरम्यान, पिकांचे अन्न व पाणी घेण्याचे कार्य बंद पडून पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
02487
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.