समर्थ अभियांत्रिकीचा बटान पेनिन्सुला स्टेट युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार
बेल्हे, ता. ३ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स या शैक्षणिक संस्थेचा, नुकताच फिलिपिन्सच्या बटान पेनिन्सुला स्टेट युनिव्हर्सिटी यांच्यासोबत शैक्षणिक सामंजस्य करार झाला आहे. अशी माहिती बेल्हे येथील समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली. दरम्यान शैक्षणिक देवाणघेवाण सहयोगी संशोधन उपक्रमांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. फिलिपिन्स देशातील बटान पेनिन्सुला स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधित्व करताना विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी सेवांचे उपाध्यक्ष प्रो. एड्रियन सी. पेर्डियो, आंतरराष्ट्रीय संबंध कार्यालयाचे संचालक डॉ. जोआन डी. लोब्रिनो, तंत्रज्ञान महाविद्यालयाचे डीन डॉ. रोवेना बी. व्हॅलेरियो, पदवीधर महाविद्यालयाचे डीन डॉ. एरियल ए. बोंगको आणि ओराणी कॅम्पसचे डीन ऑफ इंस्ट्रक्शन डॉ. अलोन्झो एल. मोर्टेजो आदी मान्यवर उपस्थित होते.
समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे रिसर्च, इनोवेशन अँड इंटरनॅशनलाईजेशन सेलचे संचालक डॉ. प्रतीक मुणगेकर यांनी समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्यावतीने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. डीन व्हॅलेरियो यांनी बीपीएसयूच्या मुख्य कॅम्पसमध्ये सर्वांचे स्वागत केले. दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमांचा, संसाधनांचा आणि सुविधांचा आढावा एकमेकांशी शेअर केला. समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सने रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि अंतराळ तंत्रज्ञानातील अत्याधुनिक सुविधांविषयीच्या अत्याधुनिक प्रयोगशाळांची स्थापना केल्याचे डॉ. मुणगेकर यांनी सांगितले. दरम्यान प्रो. पेर्डिओ यांनी या कामगिरीचे कौतुक केले आणि संभाव्य एक्सचेंज प्रोग्रामद्वारे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि प्रत्यक्ष अनुभव प्रदान करण्याच्या कार्यक्रमाबाबत डॉ. मुणगेकर यांच्याशी सहमती दर्शविली. दरम्यान हा शैक्षणिक सामंजस्य करार झाल्याने संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, रिसर्च इनोवेशन अँड इंटरनॅशनलायझेशन सेलचे संचालक डॉ. मुणगेकर, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर आदींनी संबंधितांचे अभिनंदन केले.
बेल्हे (ता. जुन्नर) : फिलिपिन्स देशातील बटान पेनिन्सुला स्टेट युनिव्हर्सिटीशी शैक्षणिक सामंजस्य करारप्रसंगी, बेल्हे येथील समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे प्रतिनिधी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.