सरदार पटेल हायस्कूलमध्ये वारी सोहळा

सरदार पटेल हायस्कूलमध्ये वारी सोहळा

Published on

बेल्हे, ता. ४ : आणे (ता. जुन्नर) येथील सरदार पटेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणापासून श्री रंगदास स्वामी मंदिरापर्यंत दिंडी सोहळा काढली. येथे श्री रंगदास स्वामी मंदिर परिसरात ज्ञानोबा- तुकारामाच्या गजरात, दिंडी सोहळ्याचे स्वागत देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते, माजी अध्यक्ष विनायक आहेर, बंडू आहेर, पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर, शिंदेवाडीचे उपसरपंच खंडू बेलकर, बाळासाहेब दाते, माजी सरपंच अजित शिंदे यांनी केले.
श्री रंगदास स्वामी मंदिरात ‘श्रीं’च्या आरतीचा भव्य सोहळा अनुभवत खिचडीचा आस्वाद घेत दिंडीने ग्रामप्रदक्षिणा घातली. त्यानंतर दिंडी नांदूररोडने पुन्हा विद्यालयाकडे रवाना झाल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक धोंडिभाऊ शिंदे यांनी दिली. कार्यक्रमाचे नियोजन सुरेखा कदम यांनी केले. यासाठी मुक्ताबाई देवस्थान व यमाईमाता देवस्थानचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com