बांगरवाडीत आषाढीला श्री गुप्त विठोबा यात्रोत्सव
बेल्हे, ता. ४ : बांगरवाडी (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. ६) आषाढी एकादशीनिमित्त श्री गुप्त विठोबा यात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. याठिकाणी जमिनीखालील खडकातील भुयारात श्री गुप्त विठोबा देवस्थान आहे. बांगरवाडी येथे आषाढी एकादशीनिमित्त ग्रामस्थांच्यावतीने यात्रोत्सवानिमित्त, श्री गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी दर्शन रांगांची सुसज्ज व्यवस्था केलेली आहे. याठिकाणी डोंगराच्या कडेला निसर्गरम्य वातावरणात जमिनीखालील खडकातील भुयारात असलेल्या श्री गुप्त विठोबा देवस्थानाजवळ, जमिनीवर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे भव्य मंदिर बांधलेले आहे. याठिकाणी यात्रोत्सवासाठी पुणे, नगर जिल्ह्यांसह आजूबाजूच्या तालुक्यांतून मोठ्या संख्येने भाविक श्री गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी रांगा लावत असतात. दरम्यान यात्रेकरूंसाठी ग्रामस्थ मंडळी व देवस्थान संस्थेच्यावतीने भाविकांना मोठ्या प्रमाणावर दिवसभर उपवासाच्या साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात येतो. याठिकाणी आजूबाजूच्या गावांतून दर्शनासाठी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातूनही अनेक भाविक येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.