बेल्ह्यात विद्यार्थ्यांच्या संतांच्या वेशभूषा लक्षवेधी
बेल्ह्यात विद्यार्थ्यांच्या वेशभूषा लक्षवेधी

बेल्ह्यात विद्यार्थ्यांच्या संतांच्या वेशभूषा लक्षवेधी बेल्ह्यात विद्यार्थ्यांच्या वेशभूषा लक्षवेधी

Published on

बेल्हे, ता. ६ : बेल्हे (ता. जुन्नर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं. १ या शाळेमध्ये, आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल - रुक्मिणी, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई अशा अनेक संतांची वेशभूषा करत दिंडीमध्ये सहभाग घेतला. त्या लक्षवेधी ठरल्या.
यावेळी दिंडीनिमित्त शाळेमध्ये छोटासा रिंगण सोहळाही आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष सदाशिव बोरचटे व उपाध्यक्ष सावकार पिंगट, मोहन मटाले,  जानकू डावखर, मनोहर पिंगट - भोरे, पोपट संभेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान संपूर्ण गावातून दिंडी सोहळ्याची ग्रामप्रदक्षिणा झाली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रीतम मुंजाळ, उपाध्यक्ष वैशाली मटाले, दादाभाऊ मुलमुले यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराचे नियोजन केले. दिंडी सोहळ्याच्या आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे उपशिक्षक  हरिदास घोडे, संतोष डुकरे, कविता सहाणे, सुवर्णा गाढवे, प्रविणा नाईकवाडी, योगिता जाधव, सुषमा गाडेकर, अंजना चौरे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी ईश्वर पिंगट, स्वाती कोकणे, गोरक्षनाथ शिरतर, प्रज्ञा शर्मा, पायल सोनवणे आदी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.

02535

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com