पारगाव तर्फे आळे येथे गुणवंतांचा सन्मान
बेल्हे, ता. ८ : पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे मोरया प्रतिष्ठान नेहरमळा गणेशोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित स्मार्ट व्हिलेज पारगाव सन्मान सोहळ्यात, नुकतेच परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, शाल व कलमी आंब्याचे रोप असे या सन्मानाचे स्वरूप होते.
यावेळी वित्त लेखाधिकारी बाळासाहेब तट्टू, वैद्यकीय सेवेत कार्यरत डॉ. आशिष चव्हाण, केवळ २३ व्या वर्षी न्यायाधीश बनलेले आकाश हरिभाऊ तट्टू, पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या रवीना डुकरे, आदर्श सरपंच लताताई चव्हाण, पाटबंधारे विभागाचे सुभाष झिंजाड, प्रगतशील शेतकरी रामदास चव्हाण, अभिनेता केशव डुकरे व गाडामालक मयूर डुकरे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, बाजार समितीच्या संचालिका प्रियांका शेळके, चंदाताई गाडगे, संतोष येवले, संभाजी चव्हाण, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक विकास चव्हाण आदी उपस्थित होते.
दरवर्षी मोरया प्रतिष्ठान वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, रक्तदान, प्रेरणादायी व्याख्याने, महिलांसाठी होम मिनिस्टर, प्रश्नमंजूषा असे सामाजिक उपक्रम राबवत असते. यावर्षी प्रथमच गावातील मान्यवरांचा विशेष सन्मान सोहळा घेण्यात आला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्नील सोनवणे, कार्याध्यक्ष विकास चव्हाण, उपाध्यक्ष साहिल डुकरे, खजिनदार पवन चव्हाण, मार्गदर्शक डॉ. दत्तात्रेय चव्हाण, संजय ढेरंगे आदींनी परिश्रम घेतले. अक्षय सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. दत्तात्रेय चव्हाण यांनी सूत्रसंचालन, तर विकास चव्हाण यांनी आभार मानले.
2606
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.