बेल्हे येथे विद्यार्थ्यांकडून आकर्षक वेशभूषा

बेल्हे येथे विद्यार्थ्यांकडून आकर्षक वेशभूषा

Published on

बेल्हे, ता. २३ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील इंदिरानगर (बेल्हे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करत शाही सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी जुन्नर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र पिंगट, सरपंच मनीषा डावखर, कैलास आरोटे, संजय बांगर, अल्पेश सोनवणे, रितेश देशमुख, गणेश पिंगट, संदेश पिंगट, शरद खोल्लम, आकील शेख आदी अंगणवाडी सेविका कांता पिंगट व मदतनीस उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, तसेच इंदिरानगर (बेल्हे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल कुटे व सहशिक्षिका सुरेखा कुटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

02784

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com