

बेल्हे, ता. २२ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची सॅंडोज या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.
येथील समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले यांनी ही माहिती दिली. दरम्यान, समर्थ शैक्षणिक संकुलात ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलच्या वतीने, पूल कॅम्पस ड्राइव्ह २०२६चे आयोजन केले होते. या कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या अंतिम वर्षातील २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. दरम्यान, सॅंडोज कंपनीचे एचआर समीर चव्हाण व उत्पादन विभाग प्रमुख प्रदीप गाडे यांनी निवड ही प्रक्रिया पूर्ण केली. ऑपरेटर व सुपरवायझर या पदांसाठी या मुलाखतीचे आयोजन केले होते. संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
समर्थ फार्मसीमधील सुपरवायझर पदासाठी यश हादगे, महेश पुजारी व सिद्धेश नऱ्हे, तर ऑपरेटर पदासाठी राहुल राऊत या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.