बेल्हे बसस्थाकात
पाणपोईचा उपक्रम

बेल्हे बसस्थाकात पाणपोईचा उपक्रम

Published on

बेल्हे, ता. ७ : येथील एसटी बसस्थानक परिसरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘एस. टी. बसस्थानक मित्र मंडळा’च्या वतीने मोफत पाणपोई उपक्रम सुरू करण्यात आला.
बेल्हे (ता. जुन्नर) एसटी बसस्थानक परिसरात  या मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात प्रवासीवर्ग व स्थानिक नागरिकांसाठी मोफत पाणपोईचा उपक्रम  राबवण्यात येतो. या उपक्रमाचा प्रारंभ बाळशिराम महाराज बांगर, जुन्नर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र पिंगट, किसनराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी माजी सरपंच गोरक्षनाथ वाघ, शिवाजी डुंबरे, वृत्तपत्र विक्रेते पांडुरंग संगमनेरकर, रमेश पिंगट, गोरख पिंगट, संजय पिंगट, संतोष पिंगट, चंद्रकांत घोडके, जालिंदर गायकवाड, दत्तोबा गुंजाळ, तात्या लामखडे, अंबादास आरोटे, वामन नेहरकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com