कौशल्य विकास कार्यशाळेत 
‘समर्थ’चे १०० विद्यार्थी सहभागी

कौशल्य विकास कार्यशाळेत ‘समर्थ’चे १०० विद्यार्थी सहभागी

Published on

बेल्हे, ता. १० : बेल्हे (ता. जुन्नर) येथे समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने, नुकतेच कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन केले होते.
बेल्हे येथे समर्थ शैक्षणिक संकुलात आयोजित या कार्यशाळेसाठी, विविध महाविद्यालयातील १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेक शेळके, विश्‍वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, समर्थ कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्सचे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार, डॉ. लक्ष्मण घोलप, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, डॉ. शरद पारखे आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेस संगणक क्षेत्रातील तज्ञ युवराज पोंडकुळे यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डाटा अनालिसिस व एआय (एआय) टूल्स या विषयावर कौशल्य आत्मसात करण्याचे मार्गदर्शन केले. ‘‘कच्च्या माहितीवर प्रक्रिया करून त्यातून महत्त्वाचे निष्कर्ष काढणे. याद्वारे व्यवसायांना भविष्यातील निर्णय घेण्यास मदत होते. एआय मुळे आता हे काम अत्यंत वेगाने आणि अचूकपणे करणे शक्य झाले आहे,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. गणेश बोरचटे यांनी आभार प्रदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com