बेल्हे येथील बाजार पथारीवर

बेल्हे येथील बाजार पथारीवर
Published on

बेल्हे (ता. जुन्नर), ता. १९ : बेल्हे येथे दर सोमवारी बैलबाजारासोबतच भाजीपाल्याचा मोठा आठवडे बाजार भरतो. या बाजारात जुन्नर तालुक्यासह नगर जिल्ह्यातूनही शेतकरी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात. मात्र, गेल्या काही काळापासून या बाजारात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी आणि ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
येथील बाजार समितीत ओटे असूनही छताअभावी शेतकऱ्यांना जमिनीवर पथारी मांडावी लागते. पावसाळ्यात अंतर्गत रस्त्यांवर चिखल होतो, तर सायंकाळी विजेच्या दिव्यांअभावी शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात माल विकावा लागतो. पार्किंगच्या सुविधेअभावी वाहने ओढ्याकाठी लावावी लागतात, ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होते. मुख्य रस्त्यावर होणाऱ्या कोंडीमुळे एस.टी. बस बाह्यवळण मार्गाने जातात. याचा फटका विद्यार्थी व प्रवाशांना बसत आहे.

बाजारातील मुख्य समस्या
- शेडचा अभाव : ओट्यांवर छत नसल्याने शेतकऱ्यांना उन्हातान्हात माल विकावा लागतो.
- जागेची समस्या : जागा न मिळाल्यास शेतकऱ्यांना जमिनीवर पथारी टाकून किंवा रस्त्याच्या कडेला बसावे लागते.
- रस्त्यांची दुरवस्था : बाजारातील अंतर्गत रस्त्यांवर पावसाळ्यात चिखल साठतो; तिथे सिमेंट काँक्रिटीकरण करणे आवश्यक आहे.
- प्रकाश व्यवस्थेची कमतरता : सायंकाळनंतर दिवे नसल्याने अंधाराचा फायदा घेत व्यापारी कमी भावात माल मागतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान.
- वाहतूक कोंडी : बैलबाजारामुळे मुख्य रस्त्यावर कोंडी होते, परिणामी एसटी बस गावात न येता बाह्यवळण रस्त्याने जातात. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना मोठी पायपीट करावी लागते.
- पार्किंगची अडचण : ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग नसल्याने ओढ्याकाठी वाहने लावावी लागतात.
- सुरक्षेचा प्रश्‍न : बाजारात पाकीटमारीच्या घटना घडत असून, महिला विक्रेत्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस गस्तीची गरज आहे.
- प्लॅस्टिकचा वापर : बाजारात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होतो.

सकारात्मक बाबी
- येथील शेतकऱ्यांच्या घराशेजारी पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
- महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत.
- बाजार संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी कचरा उचलला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com