मोरांची पाण्यासाठी बांगरवाडीत वणवण

मोरांची पाण्यासाठी
बांगरवाडीत वणवण
Published on

बेल्हे, ता. २८ : बांगरवाडी (ता. जुन्नर) परिसरात उन्हाची तीव्रता वाढल्याने ३०० हून अधिक मोरांची पाण्यासाठी वणवण होत आहे. वनविभागाने तातडीने पाणवठे तयार करावेत, तसेच दानशूर संस्थांनी धान्य व पाणी व्यवस्थेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. बांगरवाडी परिसरात मोरांची संख्या मोठी आहे. मात्र, कडक उन्हाळ्यामुळे नैसर्गिक जलस्रोत आटल्याने हे पक्षी मानवी वस्तीकडे वळत आहेत. दरवर्षी स्थानिक ग्रामस्थ आणि रोटरी क्लबसारख्या संस्था मोरांच्या खाद्याची व पाण्याची सोय करतात. यंदाही ही गरज भासत असून, नारायण सावंत, राजेंद्र कदम, किरण फापाळे, प्रभाकर डोंगरे यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. वन्यप्राणी उन्हाने कासावीस होत असल्याने समाजाने मदतीचा हात द्यावा, अशी विनंती सुभाष रोकडे, कृष्णा बांगर व अन्य ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com