Sat, March 25, 2023

मेंगडेवाडीत वटवृक्षांच्या रोपांचे रोपण
मेंगडेवाडीत वटवृक्षांच्या रोपांचे रोपण
Published on : 7 February 2023, 8:32 am
पारगाव, ता. ७ : मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) येथील श्री गण्या डोंगर परिसरात वटवृक्षाच्या रोपांचे रोपण करण्यात आले. ज्येष्ठ अंगणवाडी सेविका स्वर्गीय सीताबाई अंकुश पोहेकर यांच्या स्मरणार्थ स्मृतीवृक्ष रोपण करून हरीत श्रद्धांजली वाहण्यात आली. ''वटवृक्ष मेंगडेवाडी-एक हरीत चळवळ'' या ग्रुप अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
पोहेकर कुटुंबियांकडून जलप्रदूषण टाळण्यासाठी रक्षा पाण्यामध्ये विसर्जित न करता रोपांच्या लागवडीसाठी तयार केलेल्या खड्ड्यात रक्षा विसर्जित करून वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ही झाडे भविष्यात नेहमीच आमच्या आई स्मृतींना उजाळा देतील अशी भावना त्यांचा मुलगा भागवत अंकुश पोहेकर यांनी व्यक्त केली. यावेळी स्वर्गीय सीताबाई पोहेकर त्यांच्या मुलगा-सुन, मुलगी-जावई, जावई व इतर नातेवाईक उपस्थित होते.
......................
02018