लोणी येथे महाशिवरात्रीनिमित्त 
अखंड हरीनाम सप्ताह

लोणी येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताह

Published on

पारगाव, ता. ८ : लोणी (ता. आंबेगाव) येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित अखंड हरीनाम सप्ताहाचे हे ५० वे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने रविवार (ता. १२) ते रविवारपर्यंत (ता. १९) कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कीर्तन महोत्सवात राज्यातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा तसेच दररोज महाप्रसादाचे आयोजन केल्याची माहिती समस्त ग्रामस्थ लोणी यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
रविवार (ता. १२) रोजी वर्धापन दिनानिमित्त सकाळी ८ ते १० होमहवन, सकाळी १० ते २ पालखी मिरवणूक, दुपारी ३ वाजता वीणा पूजन, दुपारी ४ ते ५ पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ कीर्तन व नंतर महाप्रसाद, सप्ताहकाळात दररोज अखंड वीणा, पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ८ ते ११ पारायण, सकाळी ११ ते १२ गाथा पूजन, दुपारी ३ ते ५ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ हरीकीर्तन, रात्री ९ वाजता सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे. सप्ताह काळात रोज नामवंत किर्तनकारांचे कीर्तन होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.