माजी विद्यार्थी उभारणार आधुनिक प्रयोगशाळा

माजी विद्यार्थी उभारणार आधुनिक प्रयोगशाळा

Published on

पारगाव, ता. ९ : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री शिवाजी विद्यालयातील सन १९७२-७३ व १९७३-७४ च्या इयत्ता दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल ५० वर्षांनी एकत्र येत विद्यालयाच्या आधुनिक प्रयोगशाळा उभारणीसाठी तीन लाख रुपयांचा निधी संकलित करण्याचा त्यांनी निश्चय केला.

विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच पार पडला. यावेळी दोन्ही बॅचचे मिळून एकूण ६० माजी विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाच्या आधुनिक प्रयोगशाळा उभारणीसाठी तीन लाख रुपये निधी संकलित करण्याचा निश्चय माजी विद्यार्थ्यांनी यावेळी केला. या मेळाव्यातच रोख ४० हजार रुपये जमा झाले.

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमा पूजन, तसेच दीप प्रज्वलनाने मेळाव्याची सुरुवात झाली मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक डॉ. अशोक पगारिया, ज्ञानेश्वर विधाटे, विद्यालयाचे प्राचार्य डी. आर. गायकवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. जी. जाधव, सेवानिवृत्त प्राचार्य लक्ष्मण वाळुंज, प्रा. रावसाहेब जाधव उपस्थित होते.

मेळाव्याचे नियोजन खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, अशोक जाधव, डॉ. वसंत खांडगे, वामन वळसे पाटील, ज्ञानेश्वर ढगे, बाबूराव ढोबळे, रामदास रोडे, गोविंद देशमुख, जयवंत तिखे यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी केले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान वाघ यांनी केले.
-----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.