''भीमाशंकर''कडून ऊस लागवडीच्या नोंदीसाठी मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''भीमाशंकर''कडून ऊस लागवडीच्या नोंदीसाठी मुदतवाढ
''भीमाशंकर''कडून ऊस लागवडीच्या नोंदीसाठी मुदतवाढ

''भीमाशंकर''कडून ऊस लागवडीच्या नोंदीसाठी मुदतवाढ

sakal_logo
By

पारगाव, ता. २७ : दत्तात्रेयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने कार्यक्षेत्र व परिसरात लागवड हंगाम २०२२-२३ मध्ये को. ८६०३२, को.व्हीएसआय १८१२१, एम.एस.१०००१ या मध्यम ते लवकर पक्व होणाऱ्या ऊस जातीच्या लागवडीसाठी मे २०२३ अखेर मुदतवाढ दिलेली असून लागवडीसाठी आवश्यक रोपांची मागणी विभागीय शेतकी कार्यालयाकडे नोंद करण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केले.
याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले की, चालू ऊस लागवड हंगामामध्ये झालेल्या जास्त पावसामुळे कारखाना कार्यक्षेत्र व परिसरामध्ये मागील हंगामाच्या तुलनेत ऊस लागवड कमी झाली तसेच चालू गाळप हंगामामध्ये तोडणी केलेल्या उसाचा खोडवा राखणेचे प्रमाण कमी असलेने पुढील गाळप हंगामासाठी कमी ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. गाळपासाठी अधिक ऊस उपलब्ध होण्याकरीता माजी गृहमंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सभेमध्ये झालेल्या निर्णयानुसार को. ८६०३२, को.व्हीएसआय १८१२१, एम.एस.१०००१ या जातीचे बेणे व रोपे वापरून लागवड करणेस एप्रिल २०२३ अखेर व फक्त रोपांद्वारे मे २०२३ अखेर ऊस लागवड करणेस मुदतवाढ देणेचा निर्णय घेतला असून सदरचा ऊस गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपास घेणेचे निश्चित केले आहे.