धामणी येथील साई विधाटेची सैन्यदलात टेक्निकल विभागात निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणी येथील साई विधाटेची सैन्यदलात टेक्निकल विभागात निवड
धामणी येथील साई विधाटेची सैन्यदलात टेक्निकल विभागात निवड

धामणी येथील साई विधाटेची सैन्यदलात टेक्निकल विभागात निवड

sakal_logo
By

पारगाव, ता. २१ : धामणी (ता. आंबेगाव) येथील साई संपत विधाटे या तरुणाची भारतीय सैन्य दलात टेक्निकल (तांत्रिक) विभागात नियुक्ती झाल्याबद्दल धामणी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच रेश्मा अजित बोऱ्हाडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील साई विधाटे याने अतिशय कष्टाने आणि मेहनतीने हे यश संपादन केले आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंबाची आलेली जबाबदारी आणि परिस्थितीची जाण या सगळ्याचा विचार करून गेली तीन चार वर्षे या तरुणाने मेहनत घेऊन सैन्य दलाच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हे यश संपादन केल्याबद्दल परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.
साईचा सरपंच रेश्मा बोऱ्हाडे यांच्या हस्ते सत्कार करून त्याला पुढील कार्यासाठी आणि देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी शिरदाळे गावचे उपसरपंच मयूर सरडे, सचिन बोऱ्हाडे, सीताराम जाधव, चेतन रोडे, अक्षय रोडे, भाऊसाहेब करंडे, अवि बोऱ्हाडे, कल्पेश वाघ शबाना इनामदार, गंगूबाई वाळुंज उपस्थित होत्या.