
मेंगडेवाडी येथे रोड रोलर बेवारस
पारगाव, ता.२८ : मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) ते जारकरवाडी रस्त्याच्या कडेला सुमारे एक वर्षापासून राज्य शासन सार्वजनिक बांधकाम विभाग घोडेगाव अशा प्रकारचा उल्लेख असलेला रोड रोलर बेवारस अवस्थेत उभा असल्याने रोड रोलर वाहतुकीला अडथळा तसेच अपघाताला कारणीभुत ठरत आहे. यामुळे बांधकाम विभागाने रोड रोलर घोडेगाव किंवा मंचर येथील कार्यालयात घेऊन जावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात जाण्यासाठी मंचर पारगाव रस्ता, लोणी धामणी जारकरवाडी रस्ता आहे या रस्त्याच्या जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मागील वर्षी पावसाळा चालू होण्याअगोदर खड्डे बुजवले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ड्रायव्हरने जारकरवाडी फाटा येथील रस्त्याच्या कडेला रोड रोलर उभा करून ठेवला. रात्रीच्या वेळी मोटरसायकल चालकांना हा रोड रोलर दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
02300