धामणीत वक्तृत्व स्पर्धेत ११५ स्पर्धकांचा सहभाग

धामणीत वक्तृत्व स्पर्धेत ११५ स्पर्धकांचा सहभाग

पारगाव, ता. ६ : धामणी (ता. आंबेगाव) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती आणि ज्ञानज्योती शिक्षण व आरोग्य संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ४५ शाळांमधील एकूण ११५ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेते स्पर्धक - पहिली ते चौथी - प्रथम स्वरा प्रवीण जाधव, व्दितीय अर्ष अक्षय काळे, तृतीय स्वरा संदीप वाळुंज, उत्तेजनार्थ वैष्णवी विनोद जाधव.
पाचवी ते सातवी - प्रथम यशवंत हिंदुराव गेजगे, व्दितीय समृद्धी राजेश गवंडी, तृतीय पूर्वा स्वप्नील काळे व महिमा सचिन रोडे. आठवी ते दहावी प्रथम सानिका अमोल इंगवले, व्दितीय ईश्वरी हेमंत सैद व दिक्षा ज्ञानेश्वर पोखरकर, तृतीय रसिका संतोष बारवे व श्रेया शैलेश थोरात. अकरावी ते बारावी प्रथम संस्कृती योगेश जाधव, व्दितीय सानिया इम्तियाज शेख व राजश्री राजेश हाडवळे, तृतीय आदिती संजय चासकर व सानिका संदीप थोरात.
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी डायनॅमिक भोसरी रोटरी क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, माजी सरपंच सागर जाधव, विलास पगारिया, शांताराम जाधव, अण्णासाहेब बोऱ्हाडे, बबन भूमकर, वसंत जाधव, बाळासाहेब विधाटे, खडकवाडी माजी सरपंच अनिल डोके, पोलिस पाटील सूरज जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम, सोसायटीचे अध्यक्ष कोंडीभाऊ तांबे, शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य डी. आर. गायकवाड, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा कथले, कैलास महाराज सुक्रे, माळी महासंघ आंबेगाव तालुका उपाध्यक्ष दीपक विधाटे, ज्ञानज्योती शिक्षण व आरोग्य संस्थेच्या अध्यक्षा सुनीता विधाटे, उपाध्यक्ष प्रदीप भुमकर, संचालक किशोर विधाटे, चंद्रकला भुमकर, अक्षय विधाटे, प्रसाद विधाटे, रोहित भूमकर, योगेश जाधव, राजाराम विधाटे, बाळासाहेब विधाटे, अमोल जाधव, शिरीष बढेकर, सुनील करंजखेले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे संचालक अक्षय विधाटे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com