थंड पाण्यासाठी काळ्या माठांना नागरिकांची पसंती

थंड पाण्यासाठी काळ्या माठांना नागरिकांची पसंती

पारगाव, ता. ४ : कडक उन्हाळा जाणवू लागला असून, थंडगार पाण्यासाठी मातीच्या काळ्या माठांना मागणी वाढली आहे. माठातील थंड पाणी आरोग्याच्या दृष्टीने चांगले असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही नागरिक माठातील थंड पाणी पिण्यासच प्राधान्य देतात. त्यामुळे माठ बनविण्यासाठी कुंभारांचीही लगबग सुरू झाली आहे.

उन्हाळा सुरू झाला असून उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. नागरीकांना गारवा देणारा गरिबांचा ‘फ्रिज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठालाही मागणी वाढली आहे. थंड पिण्याच्या पाण्यासाठी सर्वांनाच फ्रिज घेणे परवडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोक थंड पाण्यासाठी आवर्जून माठ खरेदी करतात.

अवसरीतील माठ प्रसिद्ध
पुणे जिल्ह्यात मातीचे माठ बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अवसरी बुद्रूक (ता. आंबेगाव) येथील कुंभारवाड्यामध्ये सहा कुटुंबे मोठ्या प्रमाणावर माठ बनवतात. तयार झालेल्या माठांची विक्री मंचर, खेड, शिरूर, जुन्नर तसेच पुणे, पिंपरी चिंचवड येथील व्यापाऱ्यांना ठोक स्वरूपात विकतात. एक माठ १५० ते १७५ रुपयांना व मोठ्या आकाराचा रांजण ५०० ते ६०० रुपयांना विकला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com