लोणीच्या उपसरपंचपदी प्रकाश गायकवाड बिनविरोध

लोणीच्या उपसरपंचपदी प्रकाश गायकवाड बिनविरोध

पारगाव, ता. २ : लोणी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रकाश मधुकर गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती ग्रामसेवक अनिल टेमकर यांनी दिली.
आदिका खोमणे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सावळेराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेत उपसरपंच पदाच्या निवडणुकीत प्रकाश गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली.

यावेळी मावळत्या उपसरपंच आदिका खोमणे, ग्रामपंचायत सदस्य स्वाती वाळुंज, राहुल आढाव, राजेंद्र वाळुंज, प्रदीप कोचर, मंगल गायकवाड,
पुष्पा रोकडे आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच गायकवाड यांचा नाईक व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर सभेचे सचिव म्हणून ग्रामसेवक अनिल टेमकर यांनी कामकाज पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com