मेंगडेवाडी हद्दीत आढळला 
अनोळखी महिलेचा मृतदेह

मेंगडेवाडी हद्दीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

पारगाव, ता. २ : मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यामधील पाइपलाइनमध्ये अडकलेल्या अवस्थेत अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेंगडेवाडी गावच्या हद्दीतील गवारीमळा परिसरातून डिंभे धरणाचा उजवा कालवा जात असून, या वस्तीमधील शेतकरी अनिल प्रभाकर गवारी हे कालव्या जवळून जात असताना बाळासाहेब नाथा गवारी यांच्या पाइपलाइनला अनोळखी महिलेचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. अनिल गवारी यांनी ही माहिती गावचे पोलिस पाटील नितीन मेंगडे यांना दिली. त्यानंतर या घटनेची खबर नितीन मेंगडे यांनी पारगाव पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत महिलेच्या अंगात हिरव्या रंगाचा फूल बाह्याचा कुर्ता व गुलाबी रंगाची सलवार असलेला अनोळखी महिलेचा मृतदेह असून, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पारगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद घोडके पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com