पोंदेवाडीत भिंत कोसळून वृद्ध महिला जखमी

पोंदेवाडीत भिंत कोसळून वृद्ध महिला जखमी

पारगाव, ता. ११ : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील रणपिसेवस्ती येथे पावसामुळे घराची भिंत कोसळली. यामध्ये घरात झोपलेल्या सुलाबाई रखमा रणपिसे (वय ६७) या वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्या आहे.

सोमवारी (ता.१०) रात्रीपासून पोंदेवाडी परिसरात पावसाला सुरुवात झाली. मंगळवार (ता.११) पहाटेपर्यंत पाऊस पडत होता. येथील रणपिसे वस्ती येथे मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रखमा रभाजी रणपिसे यांच्या घराची भिंत पावसाने खचून कोसळल्याने झोपलेले सुलाबाई रणपिसे गंभीर जखमी झाल्या. घरात झोपलेले रखमा रभाजी रणपिसे सुदैवाने बचावले. भिंत कोसळ्याचे समजताच जवळच राहणारे रणपिसे यांचे भाचे कुंडलिक पोखरकर यांनी जखमी सुलाबाई रणपिसे यांना घराच्या बाहेर काढून पारगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यांच्या पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे.

या वृद्ध दांपत्याचे जुने घर मोडकळीस आल्याने ग्रामपंचायतीने रणपिसे यांच्या नावाचा समावेश प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल यादीत केला आहे. परंतु, एक वर्ष होऊनही घरकुलासाठी निधीची तरतूद झाली नाही. शासनाने घरकुलासाठी तातडीने निधी उपलब्ध करावा, अशी मागणी सरपंच नीलम अनिल वाळुंज यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com