आंबेगाव तालुक्याचा शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

आंबेगाव तालुक्याचा शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

Published on

पारगाव, ता. ५ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. आंबेगाव तालुक्याचा पूर्व भागात सुरवातीला पावसाने सुरवात चांगली केली होती. बऱ्याच वर्षांनी मृग नक्षत्रात पेरणी होण्याचा योग आला होता बाजरी, मका, सोयाबीन, कडधान्य तर शिरदाळे परिसरात बटाटा लागवड आणि इतर नगदी पिके यांची पेरणी केली. परंतु गेले १५ दिवस पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे पावसाची अत्यंत गरज असून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसल्याचे शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, पहाडदरा ग्रामपंचायत सदस्य संकेत वायकर, धामणी ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव यांनी सांगितले.

एक रुपयात सरकारी पीकविमा काढण्याचे काम प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर सुरू असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या पिकांचा पीकविमा काढावा असे आवाहन यावेळी पूर्व भागातील सर्व सरपंचाच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले. तर काही तांत्रिक मदत ग्रामपंचायत पातळीवर लागली तर ती शेतकऱ्यांना केली जाईल असे शिरदाळे चे माजी उपसरपंच मयुर सरडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.