वनविभागाने बसविला शिरदाळे येथे पिंजरा
पारगाव, ता.२७ : शिरदाळे (ता. आंबेगाव) येथे मागील आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या होत्या. हा परिसर जिरायती भाग असून, येथे उसाची शेती नसतानाही बिबट्याचा वावर वाढून पाळीव प्राण्यांवर हल्ले होऊ लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ग्रामस्थांच्या मागणीवरून वनविभागाने पिंजरा बसविला. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वनविभागाच्या धामणी क्षेत्राच्या वनपाल सोनल भालेराव यांच्या सूचनेवरून वनविभागाचे कर्मचारी दिलीप वाघ, कल्पेश बढेकर यांनी शिरदाळे येथे पिंजरा बसविला. यावेळी श्रीकांत मिंडे, उत्तम रणपिसे, प्रतीक तांबे आदी उपस्थित होते. पिंजरा जरी बसवला असला तरी ग्रामस्थांनी सतर्क राहावे विशेषकरून लहान मुलांच्या बाबतीत काळजी घ्यावी, रात्रीच्या वेळी अंगणात फिरू देऊ नये असे आवाहन माजी उपसरपंच मयूर सरडे यांनी केले आहे.
04528
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

