बिबट्याच्या हल्ल्यात कालवड, शेळी ठार

बिबट्याच्या हल्ल्यात कालवड, शेळी ठार
Published on

पारगाव, ता. १९ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला. यामध्ये कालवड व शेळी ठार झाली आहे.
अवसरी परिसरातील चवरेमळ्यात शनिवारी (ता.१६) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास प्रशांत वसंत चवरे यांच्या घराच्या बाहेर बांधलेल्या सहा महिन्यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला केला व कालवडीला उसाच्या शेतात ओढून नेऊन फस्त केले. तसेच विझुरावस्ती येथे राहणाऱ्या मनोज शरद चव्हाण यांच्या गोठ्याच्या पाच फूट उंच भिंतीवरून बिबट्याने सोमवारी (ता. १८) सकाळी उडी मारली व
गोठ्यातील शेळीला ठार केले.
शेळीचा ओरडण्याचा आवाज आल्याने मनोज चव्हाण यांचे वडील शरद हे घराच्या बाहेर आले. यावेळी बिबट्या शेळीला तोंडात पकडून भिंतीवरून उडी मारून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी आरडा ओरडा केल्याने व भिंत उंच असल्याने बिबट्याने मृत शेळीला जागेवरच सोडून भिंतीवरून उडी मारून शेतात पळाला.
वनरक्षक सी. एस. शिवचरण यांनी दोन्ही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात मागील वर्षभरापासून अनेक पाळीव प्राणी ठार झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा तसेच संबंधित शेतकऱ्यांना वनविभागाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अजित चव्हाण व कल्याण हिंगे पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com