आंबेगावताील ५० गावांत वाटणार देशी बियाणांचे वाण : शेख

आंबेगावताील ५० गावांत वाटणार देशी बियाणांचे वाण : शेख

Published on

पारगाव, ता. १६ : ‘‘पारंपरिक वाणांमुळे जुन्या पिढीतील लोकांना चांगले आयुर्मान होते. निरोगी जीवन जगत होते. पण सध्या ते वाण दुर्मीळ झाले आहेत. त्यांचे संवर्धन व वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढवा म्हणून ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने पहिल्या टप्प्यात आंबेगाव तालुक्यातील ५० गावात जनजागृती अभियान सुरू केले आहे. येथे मोफत देशी बियाणांचे वाण शेतकऱ्यांना दिले जाईल,’’ अशी माहिती ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रा. सलमान शेख यांनी दिली.

पारगाव (ता.आंबेगाव) येथे ग्रामपंचायत सभागृहात शुक्रवारी आंबेगाव तालुका पंचायत समिती कृषी विभाग, महाराष्ट्र जैव विविधता मंडळ (नागपूर), कृषी विज्ञान केंद्र (नारायणगाव) व ज्ञानशक्ती संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शेख बोलत होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी मनोज कोल्हे, सरपंच श्वेता ढोबळे, उपसरपंच नितीन ढोबळे,डॉ. योगेश यादव, ग्रामविकास अधिकारी कचरदास भोजने, सुनील कोरडे, नानासाहेब ढोबळे, किरण ढोबळे, वीरेंद्र ढोबळे, पार्थ ढोबळे, रोहित थोरात, अनुराग गायकवाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

पद्मश्री पुरस्कार विजेत्या बीजमाता राहीबाई पोपरे यांच्या देशी वाण बँकेतून आणलेले गहू, ज्वारी, भुईमूग, घेवडा, वाटाणा, मठ, हुलगा, नाचणी, राई, जवस, हरभरा व तूर आदि बियाणे आंबेगाव तालुक्यातील एकूण ५० शेतकऱ्यांना प्रती १० गुंठे क्षेत्र लागवडीसाठी मोफत दिले जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी ज्ञानशक्ती संस्था मंचर कार्यालयात नावनोंदणी करावी.
- सलमान शेख, प्रकल्प अधिकारी, ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था

05218

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com