पारगावत मारहाणीप्रकरणी १० जणांवर गुन्हा

पारगावत मारहाणीप्रकरणी १० जणांवर गुन्हा

Published on

पारगाव, ता. १६: पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता.१५) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास, ‘गर्दी असताना वाहन का थांबवले नाही?’ तसेच मोटार मागे पुढे घेण्याच्या कारणावरून झालेल्या शिवीगाळ व मारहाणप्रकरणी दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. याप्रकरणी दोन्ही बाजूकडच्या प्रत्येकी पाच असे एकूण १० जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल दत्तात्रेय टाव्हरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोंदेवाडी गावातील मारुती मंदिरासमोर फिर्यादी यांचा भाऊ संदीप वाळुंज याने गणेश लोले यास ‘खाली गर्दी झाली आहे. तुला वरती गाडी थांबविण्यास सांगितले होते, तरी तू का थांबला नाही’ असे म्हणाला असता गणेश लोले याने फिर्यादीचा भाऊ संदीप वाळुंज यास शिवीगाळ, दमदाटी केली. तेव्हा तेथे असलेले राजेश पोंदे यांनी संदीप वाळूंज यास मारहाण केली. यामुळे संदेश पोंदे, गणेश लोले, तुषार पोंदे, राजू मखर यांनी फिर्यादीचा मुलगा निखिल टाव्हरे यास हाताने मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. तेव्हा यातील फिर्यादी भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असता राजेश पोंदे याने फिर्यादी यांची साडी ओढून मान खाली दाबून मारहाण केली व फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून राजेश पोंदे, संदेश पोंदे, गणेश लोले, तुषार बाबाजी पोंदे, राजू मखर (सर्व रा पोंदेवाडी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
गणेश दत्तात्रेय लोले (रा. पारगाव) यांनी फिर्यादी दिली आहे. यावरून विठ्ठल बाबूराव वाळुंज, संदीप विठ्ठल वाळुंज, रामदास तात्याबा वाळूंज (सर्व रा. पोंदेवाडी) निखिल टाव्हरे (रा. निरगुडसर), गणेश पोखरकर (रा. सविंदने ता शिरूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे करत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com