दत्तात्रेय ऊस तोडणी संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब बेंडे

दत्तात्रेय ऊस तोडणी संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब बेंडे

Published on

पारगाव, ता. २५ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संलग्न संस्था असलेल्या दत्तात्रेय ऊस तोडणी व वाहतूक सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब बेंडे तर उपाध्यक्षपदी जनाबाई आजाब यांची बिनविरोध निवड झाली आहे.
माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक संस्थेची सन २०२४-२५ ते २०२९-३० या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. संस्थेच्या उपविधीप्रमाणे भीमाशंकर कारखान्याचे सहा संचालक व सभासदांमधून सात संचालक असे १३ संचालकांसाठी बिनविरोध निवडणूक पार पडली. त्यामध्ये कारखाना प्रतिनिधी म्हणून कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील, बेंडे, संचालक रामचंद्र ढोबळे, दादाभाऊ पोखरकर, रामहरी पोंदे, पुष्पलता जाधव व सभासदांमधून उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, बाबासाहेब खालकर, आनंदराव शिंदे, गणपत इंदोरे, सुभाष मोरमारे, सखाराम घोडेकर, आजाब यांची संचालकपदी निवड झालेली आहे. दरम्यान, सोमवारी (ता. २४) निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पाचारणे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी निवडीसाठी सभा आयोजित केली होती. यामध्ये वरील निवडी करण्यात आल्या.

05275

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com