जारकरवाडी यात्रेत रंगल्या लक्षवेधी चीतपट कुस्त्या
पारगाव, ता. १० : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्री वडजादेवी यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कुस्त्यांच्या आखाड्यात जिल्ह्याभरातून आलेल्या मल्लांच्या लढती लक्षवेधी ठरल्या. विजेत्या पहिलवानांना एकूण ५० हजार रुपयांच्या रोख बक्षीसे देण्यात आली.
जारकरवाडी येथील श्री वडजादेवी यात्रेला शनिवारपासून (ता. ८) उत्साहात सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी दुपारी कुस्त्यांच्या आखाड्यात जिल्हाभरातील मल्लांनी चमकदार खेळी करून चितपट कुस्त्या केल्या. निकाली कुस्ती करणाऱ्या पहिलवानास ५१ रुपयांपासून २१०० रुपयांपर्यंत बक्षीसे देण्यात आली. सुमारे ५० हजार रुपयांची रोख बक्षीसे देण्यात आली. आखाड्याची व्यवस्था सचिन लबडे, एकनाथ भांड, शरद भोजने, भरत लबडे, पोपट लोले, सुरेश मंचरे, सुभाष लबडे, खंडू भोजने आदींनी पाहिली. पंच म्हणून पहिलवान नंदू ढोबळे, राजू पाबळे, धोंडिभाऊ पाबळे यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

