अवसरीतील विहिरीत पडून 
बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

अवसरीतील विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

Published on

पारगाव, ता. १४ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला, अशी माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.
अवसरी बुद्रुक येथील अवठडा परिसरातील सुलोचना देवराम हिंगे यांच्या मालकीच्या शेतामध्ये सिद्धेश मंगेश हिंगे हा शेतामध्ये ट्रॅक्टरने शेत फणनी करण्यासाठी गेला असता विहिरीत डोकावून पाहिले असता त्याला विहिरीत बिबट्याचा बछडा आढळून आला. त्याने तत्काळ ही माहिती वनरक्षक सी. एस. शिवचरण यांना दिली. हे माहिती मिळताच शिवचरण यांनी बिबट शीघ्र कृती दलाचे मनोज तळेकर, धर्मेंद्र ढगे, चारुदत्त बांबळे, मिलिंद टेमकर, कुणाल गावडे, देवेद्य वाघ, हर्षल गावडे, हर्षल चौधरी, प्रज्वल आवारी व वन कर्मचारी अरुण खंडागळे यांना घेऊन बछड्याला बाहेर काढले. बिबट्याचा बछडा हा अंदाजे पाच ते सहा महिन्यांचा असून, ती मादी होती, असे वनपाल प्रदीप कासारे यांनी सांगितले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कोंढवळे यांनी या बछड्याचे शवविच्छेदन करून अवसरी बुद्रुक व गावडेवाडीच्या सीमेवर असणाऱ्या बिबट शीघ्र कृती दल परिसरात त्याच्यावर वनपाल प्रदीप कासारे यांच्या सूचनेनुसार अंत्यसंस्कार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com