आधुनिक तंत्रज्ञानातही काळ्या माठांना पसंती

आधुनिक तंत्रज्ञानातही काळ्या माठांना पसंती
Published on

पारगाव, ता.२८ : वातावरणात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. काळ्या माठातील थंड पाणी आरोग्याच्या दृष्टीने चांगले असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही पिण्याच्या थंड पाण्यासाठी मातीच्या माठांचा मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. पारगाव परिसरातील आठवडे बाजारात सध्या या माठांची विक्री सुरू आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक व पारगाव येथील कुंभार व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर माठ बनवतात. तयार झालेल्या माठांची विक्री मंचर ,राजगुरुनगर,लोणी, शिक्रापूर, चाकण, शिरूर पारगाव, जुन्नर तसेच पुणे, पिंपरी चिंचवड येथील व्यापाऱ्यांना ठोक स्वरूपात विकतात एक माठ २५० ते ४०० रुपयांना विकला जात आहे. तोटी असलेल्या माठांना महिलांची जास्त पसंती असल्याचे पारगाव येथील कुंभार व्यावसायिक नवनाथ राऊत यांनी सांगितले.
उन्हाच्या झळा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. यामुळे नागरिकांना थंडावा देणारा गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठालाही मागणी वाढली आहे. सर्वसामान्य लोकांना थंड पिण्याच्या पाण्यासाठी फ्रिज घेणे परवडत नाही. त्यामुळे सर्व सामान्य लोक थंड पाण्यासाठी माठ खरेदी करतात. या माठातील पाणी आरोग्यासाठी चांगले असते.
गरिबांचा फ्रिज समजल्या जाणाऱ्या मातीच्या माठांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. फोटो ओळी

05399

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com