अर्धा एकर मिरचीचे २०० जुन्या साड्यांद्वारे रक्षण! वाढत्या उन्हात २०० साड्यांनी दिली मिरचीला सावली

अर्धा एकर मिरचीचे २०० जुन्या साड्यांद्वारे रक्षण!
वाढत्या उन्हात २०० साड्यांनी दिली मिरचीला सावली
Published on

पारगाव, ता. ४ : लोणी (ता. आंबेगाव) येथील सेवानिवृत्त माजी सैनिक गुलाब सुभाष गायकवाड यांनी वाढत्या उष्णतेपासून मिरची पिकाचे संरक्षण करण्यासाठी सुमारे २०० जुन्या साड्या तसेच धोतर यांचा वापर केला आहे. यामुळे अर्धा एकर क्षेत्रातील मिरचीला सावली मिळाली आहे. या अनोख्या जुगाडामुळे शेडनेट साठी येणाऱ्या खर्चाची बचत तर झाली शिवाय मिरचीची वाढ ही चांगली झाली आहे.
गायकवाड हे लष्करातील १८ वर्षांच्या सेवेनंतर मार्च २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना शासनाच्या विविध विभागात नोकरीची संधी असताना त्यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे चुलते राज्याच्या महसूल विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुंजनगर येथील डिंभा उजव्या कालव्यावरून शेती साठी उपसा सिंचन योजना करून पाणी आणून ते विहिरीत सोडण्यात आले. त्या पाण्यावर गायकवाड कुटुंब शेतात विविध पिके घेत आहे. गायकवाड यांनीही एक एकर क्षेत्रात टोमॅटो व अर्धा एकर क्षेत्रात मिरचीचे पीक घेतले आहे. दोन्ही पिकांना कोणतेही रासायनिक खते न वापरता कृषी तज्ज्ञ जयेश वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय खतांचा वापर केला जात आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने वातावरणात तीव्र उष्णता जाणवत आहे. या उष्णतेचा परिणाम शेतातील पिकावर दिसून येत असून त्याचा वाढीवर विपरीत परिणाम होत आहे पिके सुकून वाढ खुंटत आहे.

उन्हापासून पिकांचे संरक्षण
मिरचीच्या पिकावर सावलीसाठी शेडनेट करायचे तर खर्च जास्त येणार त्यामुळे गुलाब गायकवाड यांनी शक्कल लढवत घरातील जुन्या साड्या, धोतर यांचा वापर करून मिरचीच्या पिकाला सावली तयार करून उन्हापासून पिकांचे संरक्षण केले आहे. अर्धा एकर साठी त्यांना सुमारे २०० जुन्या साड्या तसेच धोतर लागले आहे.

05420

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com