खडकवाडीत आजपासून भैरवनाथ यात्रा उत्सव

खडकवाडीत आजपासून भैरवनाथ यात्रा उत्सव
Published on

पारगाव, ता. ९ : खडकवाडी (नाथनगर, ता. आंबेगाव) येथील भैरवनाथ यात्रा उत्सव गुरुवार (ता. १०), शुक्रवार (ता. ११) असे दोन दिवस होणार आहे.
गुरुवारी सकाळी ७ ते ८ वाजता श्रींची महापूजा, हारतुरे, मांडव डहाळे, अभिषेक, सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बैलगाडांच्या शर्यती, रात्री ९ ते १० वाजता पालखी मिरवणूक, रात्री १० ते पहाटे ४ वाजता ज्ञानेश्‍वर प्रासादिक भजन मंडळाचा संगीत भजनाचा कार्यक्रम होईल. तसेच रात्री दहा वाजता नीलेशकुमार अहिरेकरसह रूपाली पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.
विजेता बैलगाड्यांसाठी एकूण तीन लाख ५१ हजार ५५५ रुपये बक्षीस देण्यात येणार असून, प्रथम क्रमांकासाठी ७५ हजार एक रुपये, व्दितीय क्रमांक ६५ हजार एक रुपये, तृतीय क्रमांक ५१ हजार एक रुपये, चतुर्थ क्रमांक ३१ हजार एक रुपये, इनाम असून, फायनलसाठी प्रथम क्रमांक ४१ हजार रुपये, द्वित्तीय क्रमांक ३१ हजार रुपये, तृतीय क्रमांक-२१ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक ११ हजार रुपये व पाचवा क्रमांक सात हजरत ७७७ रुपये इनाम असून एक अंगठी, एक फ्रिज, चार एलसीडी, चार कुलर, तीन फॅन, एक ट्रॉफी, एक बैलगाडा असे बक्षिस दिले जाणार आहे. शुक्रवारी (ता. ११) सकाळी ९ ते १२ तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम होईल. तसेच दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com